धुंदित मस्तीत
स्वःताच्याच तालात
जग हे झोकात जिंकण्या........
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
मती होईल कुंठीत
जीव येईल वेठीस
तरीही कधी न थांबण्या........
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
आनंदाच्या अपूर्व धुंदित
स्वप्ने सुखाची रंजीत
जीवन माझे सावरण्या.......
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
सदैव तत्पर राहून
वाट संधीची पाहून
स्वप्नांना ह्या पूर्ण करण्या......
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
विजयाचाब एकच ध्यास
नाही कशाचीही आस
दीप क्रांतीचा तेवण्या.........
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
काळही न जाई जिथे
स्वःसामर्थ्ये मजला नेईन तिथे
झेंडा विजयी रोवण्या.......
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या........
न भूतो, न भविष्यही
रचला नाही कोणी
असा इतिहास नवा रचण्या........
मी चाललो,
संकटांना ह्या भेदण्या..............!!
कृष्णा वर्पे.
दि.21/01/2012.
0 Comments:
Post a Comment